Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल!
न्यूज

Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल!

Aug 15, 2026

मनोज जरांगे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

सततचे दौरे आणि धावपळीमुळे प्रकृतीवर ताण:

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा झंझावती दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी सभा घेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजबांधवांशी संवाद साधला. त्याशिवाय आगामी आंदोलनाची रणनीती आखली. या सलग दौरे, प्रवास आणि प्रकृतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आला होता. पश्चिमेकडचा दौरा आटोपून अंतरवाली सराटीत परतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली.

२९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण :

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणाची तयारी सुरू असतानाच त्यांची तब्येत बिघडल्याने मराठा समाजबांधव आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध चाचण्या केल्या जात असून, उपोषण सुरू होण्यापूर्वी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *