Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!
ताज्या बातम्या

Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

Sep 3, 2026

मराठा आरक्षणाच्या लढ्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आलेले बीड जिल्ह्यातील संगम गावचे निष्ठावंत मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये आणि बीड जिल्ह्यात तीव्र शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ रायकर हे गुरुवारी रात्री उशिरा अंतरवाली परिसरात पोहोचले होते. रात्री ते परिसरातील एका शेतात इतर आंदोलकांसोबत झोपले होते.

मात्र, शुक्रवारी सकाळी सर्वजण उठल्यानंतर रायकर हे झोपेतून उठलेच नाहीत. सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उपस्थित आंदोलकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

दशरथ रायकर यांचा मृत्यू अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या रायकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *