Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!
ताज्या बातम्या नाशिक राजकारण

Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!

Aug 14, 2026

नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे सुपुत्र वामन हिरामन खोसकर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या कथीत क्लिपमध्ये वामन खोसकर हे शिवसेनेचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख रवींद्र भोये यांना शिवीगाळ करत असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

या घटनेनंतर त्र्यंबकेश्वरचे शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांत वामन खोसकर यांच्याविरोधात थेट लेखी तक्रार नोंदवली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला ही शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर दावा रवींद्र भोये यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणामुळे महायुतीतील दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये तीव्र राजकीय कलगीतुरा रंगला असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *