NEET आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ची घोषणा, 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!
ताज्या बातम्या न्यूज मनोरंजन शिक्षण

NEET आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ची घोषणा, 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!

Jul 31, 2026

मुंबई ३१ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनाची चर्चा आता रुपेरी पडद्यावर पोहोचणार आहे. या आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट केवळ राजकीय व्यंगचित्र म्हणून मर्यादित राहणार नाही.

आंदोलनाची उभारणी, त्यामागील नियोजन, त्यावेळचे वातावरण आणि घडामोडी यांचे सिनेमॅटिक स्वरूपात चित्रण करण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात वास्तव, व्यंग आणि राजकीय नाट्य यांचा संगम पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेता अभिजित दिपके कोणती भूमिका साकारणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

मात्र त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.दरम्यान, जयपूरचे संशोधक आणि लेखक गोविंद देव ब्रह्म यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करून पटकथा तयार केल्याचे सांगितले जात आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, आंदोलनाशी संबंधित काही कमी परिचित घटना आणि पडद्यामागील घडामोडींनाही चित्रपटात स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे राजकारण, वास्तव आणि व्यंग यांची सांगड घालणारा हा चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याबाबत उत्सुकता वाढत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *