New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
ताज्या बातम्या न्यूज वाहतूक

New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

Aug 14, 2026

ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील ट्रान्स हार्बर आणि हार्बर लाईनवरील उर्वरित १४ रेल्वे स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या हस्तांतरणामुळे आता स्थानकांवरील प्रवासी सुविधा, स्वच्छता, दुरुस्ती आणि व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होणार असून नवी मुंबई व ठाणे मतदारसंघातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मे २०२६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या ६ महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले होते.

एकूण १७ स्थानकांपैकी ३ स्थानके यापूर्वीच जून २०२६ मध्ये हस्तांतरित करण्यात आली होती, तर आज उर्वरित १४ स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता या सर्व स्थानकांचा कारभार पूर्णपणे मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेला आहे. विशेष म्हणजे, हस्तांतरित झालेल्या या १४ स्थानकांपैकी ११ रेल्वे स्थानके ही खासदार नरेश म्हस्के यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात येतात. या प्रक्रियेत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे देखील सहकार्य लाभले. यातील खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर हि रेल्वे स्थानके त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. सहा महिन्यांची वेळ दिलेली असतांना दोन्ही प्राधिकरणांनी मुदतीपूर्वी प्रश्न सोडविल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले विशेष आभार

खासदार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थेबाबत सतत तक्रारी येत होत्या. सिडको आणि रेल्वे प्रशासनात योग्य समन्वय नसल्यामुळे सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रेल्वे सल्लागार समितीचे (Consultative Committee on Railways) सदस्य या नात्याने खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय बैठकांमध्ये वारंवार मांडला. याची गंभीर दखल घेत केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.

हस्तांतरित झालेली १४ रेल्वे स्थानके

१. वाशी, २. सानपाडा, ३. जुईनगर, ४. नेरूळ, ५. सीवूड्स-दरावे, ६. बेलापूर, ७. ऐरोली, ८. रबाळे, ९. घणसोली, १०. कोपरखैरणे, ११. तुर्भे, १२. खांदेश्वर, १३. मानसरोवर, १४. खारघर. हस्तांतरण प्रक्रियेवेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते विजय चौगुले, शिवसेना ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उरण जिल्हाप्रमुख विनोद साबळे, गटनेते मनोज हळदणकर, संपर्कप्रमुख अंकुश कदम, महिला जिल्हाप्रमुख सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, विजय माने, नगरसेवक अमित पाटील, सौरभ शिंदे, अंकुश सोनावणे, आकाश मढवी, कविता पाटील, देवकी शिंदे, साहिल चौगुले, देवेंद्र पाटील, चेतन पाटील, राजू पाटील, साईनाथ वाघमारे, दत्ता घंगाळे, सुरेश कुलकर्णी, संजीव कुलकर्णी (DRUCC MEMBER सेंट्रल रेल्वे), अजित दुबे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हस्तांतरण प्रक्रियेला उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारीः सिडको (CIDCO) प्रशासन – राजा दयानिधी (JMD -1, सिडको), पी. एस. फुलारी (मुख्य अभियंता, नवी मुंबई), संतोष ओभासे (अतिरिक्त मुख्य अभियंता- III), व्ही. एल. पितळे (अधीक्षक अभियंता, रेल्वे), मध्य रेल्वे प्रशासन अभिषेक कुमार गुप्ता (DEN (HB)/CSMT), जवाहर गेंडले (DEE/G/CSMT), संतोष कुमार गुंजन (ADEN/JNJ) यांच्यासह मध्य रेल्वे आणि सिडकोचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *