Nilesh Sambre: राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे नाते; विशेष दिव्यांग भगिनींनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना बांधली राखी!
ठाणे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जागृती पालक संस्था ठाणे येथील विशेष दिव्यांग भगिनींनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेबांना प्रेमाने राखी बांधून भाऊ बहिणीच्या नात्याची आपुलकी व्यक्त केली
यावेळी विशेष दिव्यांग भगिनींनी निलेश सांबरे साहेबांशी संवाद साधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. राखी बांधतानाचा हा क्षण स्नेह आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित करणारा ठरला
ही राखी माझ्यासाठी प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. विशेष दिव्यांग भगिनींच्या पाठीशी सदैव उभं राहण्याचा माझा प्रयत्न राहील अशी भावना निलेश सांबरे यांनी व्यक्त केली. जागृती पालक संस्था ठाणे यांच्या वतीने झालेल्या या प्रेमळ भेटीमुळे रक्षाबंधनाचा सण अधिक अर्थपूर्ण झाला!
