Paneer ban : राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षाची बंदी; उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरही निर्बंध!
मुंबई ०५ : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या कालावधीत कृत्रिम पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा मानला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.वनस्पती तेल, स्टार्च आणि विविध रसायनांचा वापर करून तयार केले जाणारे कृत्रिम पनीर आरोग्यास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे!
