Pankaja Munde : पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘मुख्यमंत्री व्हा’, विजय वडेट्टीवारांचे आवाहन, राजकीय चर्चांना उधाण!
Pankaja Munde ०३ : भाजपच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याचे म्हटले आहे.वडेट्टीवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला योग्य न्याय मिळाला नसल्याची भावना अनेकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे.
त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, कोण पंतप्रधान होणार याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेते. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यानंतर महाराष्ट्रातील एखाद्या मराठी नेत्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर त्याचा आनंदच होईल.पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
