Panvel-Karjat Railway Line: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग ‘या’ दिवशी होणार सुरू!
नवी मुंबई १६ : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता थेट पनवेलवरून कर्जत आणि कर्जत ते पनवेल असा प्रवास करता येणार आहे. कारण कर्जत ते पनवेल हा नवा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा हा प्रवास सुसाट आणि सोपा होणार आहे. बहुप्रतिक्षित कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ऑक्टोबर २०२७ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार श्रीरंग बारणे कर्जत पनवेल लोकल सेवा व्हावी या दृष्टीने रेल्वे मंत्र्यांशी अनेकदा भेट आणि चर्चा केलेली आहे.कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे.कर्जत-पनवेल या मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या संपूर्ण परिसरातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत सोपा आणि गतिमान होणार आहे. हा मार्ग कधीपर्यंत सुरू होईल याची तारीख जरी समोर आली नसली तरी ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे!
