Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!
ताज्या बातम्या न्यूज राजकारण

Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

Aug 16, 2026

पुणे १६ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन कसबा’ जोरदारपणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रमुख महिला पदाधिकारी वैष्णवी किराड यांच्यासह कसब्यातील शेकडो पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये मोठा धक्का मानला जात आहे.

वैष्णवी किराड यांनी यापूर्वी शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणूक लढवली होती. किराड समाजात त्या एक प्रतिष्ठित आणि प्रभाव पाडणारा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. कसब्यात त्यांची मोठी ताकद असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. याविरोधात समीर पाटील यांनी न्यायालयातून स्टे-ऑर्डर आणली होती. धंगेकरांच्या या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने कसबा क्षेत्रात रणनीती आखून हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *