Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल; जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप!
मुंबई ०३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अवमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.भाजपचे सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी राऊत यांच्यावर कलम 356(2) (मानहानीकारक वक्तव्य) तसेच कलम 352 (शांतता भंग होईल या उद्देशाने अपमानास्पद किंवा अश्लील शब्दांचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.
दरम्यान, या वादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत या प्रकरणावर भाष्य केले आहे.
