Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना धक्का…शिवसेनेत राज्यभरातून मोठा पक्षप्रवेश: संघटनविस्ताराला मिळालं मोठं बळ!
ताज्या बातम्या राजकारण

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना धक्का…शिवसेनेत राज्यभरातून मोठा पक्षप्रवेश: संघटनविस्ताराला मिळालं मोठं बळ!

Aug 19, 2026

महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला मोठी ताकद मिळाली आहे. ‘नंदनवन’ या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सोबतच सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. यामध्ये धापटीचे सरपंच, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बार्शीतील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानाचे बार्शी तालुकाध्यक्ष सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड आणि महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले.चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह अनेक सरपंच आणि उपसरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातही पक्षाची ताकद वाढली आहे.

मुंबईत आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने मनसेचे माजी सरचिटणीस संतान फर्नांडिस, विभाग अध्यक्ष अमृत जावळे, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मनीष अडविलकर, आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डर दीपा सप्रे यांच्यासह मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मर्चंट नेव्ही क्षेत्रातील रवींद्र बाईंग, सुरेश साळसकर आणि ईशान्य मुंबईतील सोशल मीडिया उपाध्यक्ष राज गोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला.याशिवाय शिवशाही केबल आणि इंटरनेट असोसिएशनचे अध्यक्ष परेश तेलंग आणि मनसे केबल सेनेचे उपसचिव भारत लुडबे यांच्यासह केबल चालकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पनवेल तालुक्यात शेकापचे चिटणीस बाबा नाईक आणि जनरल सेक्रेटरी अशोक नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.राज्यभरातून होणाऱ्या या व्यापक पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. या सोहळ्याला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *