लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र व सुशोभीकरणाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण!
ठाणे (०१) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!
ठाणे ३०: येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१-०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित राहिले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता
स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ,गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण!
ठाणे २९: गेली २० वर्षे ठाणे व परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम – बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या २० वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि ‘जीओ टॅगिंगची’ नजर, नगरविकास विभागाचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची पूर्तता!
मुंबई,दि. २९: महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय),जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता!
मुंबई, दि. २९: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते,
ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली, राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी!
ठाणे : (२९ जुलै) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला
Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!
ठाणे २९ : ठाण्यातील तीन हात नाका चौकातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारणा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक अधिक सुरळीत
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील
