२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!
ठाणे

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!

Jul 30, 2026

ठाणे ३०: येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१-०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित राहिले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रदीर्घ पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून १९ कुटुंबांची घराची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते १९ लाभार्थींना त्यांच्या नवीन घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही हक्काचे घर मिळण्याची आशाच सोडून दिली होती. मात्र मा. एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादामुळे आणि नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज आम्हाला आमचे हक्काचे घर मिळाले.

२५ वर्षांनंतर स्वतःच्या घराच्या चाव्या हातात घेताना अनेक नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.या पुनर्वसनामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून, जनतेच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यास अशक्य वाटणारे प्रश्नही मार्गी लागू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *