Thane: ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठी खूशखबर.. तुम्ही रिक्षात बसण्यापूर्वीच होणार मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर!
ठाणे न्यूज वाहतूक

Thane: ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठी खूशखबर.. तुम्ही रिक्षात बसण्यापूर्वीच होणार मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर!

Aug 24, 2026

ठाणे २४ : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात उतरल्यानंतर बऱ्याचदा प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. मीटरप्रमाणे न चालणे, जास्त भाडे मागणे, प्रवाशांशी अरेरावी करणे तसेच ठरलेल्या जागी जाण्यास स्पष्ट नकार देणे यांसारख्या समस्या नेहमीच्याच बनल्या आहेत.ठाणेकरांचा हा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक तसेत सुरक्षित करण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आता ठाणेकरांच्या दररोजच्या प्रवासात नक्की कोणता बदल होणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जाऊन घ्या.नव्या निर्णयानुसार, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच प्री-पेड रिक्षा सेवा सुरु केली जाणार आहे. या सुविधेमुळे आता स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशाला प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करण्याआधीच आपल्या ठिकाणी जाण्याचे भाडे कळणार आहे.

प्रवाशाला काउंटरवर ठरलेले निर्धारित भाडे भरावे लागेल आणि त्यानंतर तातडीने रिक्षा उपलब्ध करुन दिली जाईल.फक्त प्री-पेड सेवाच नाही, तर रिक्षाचालकांच्या गैरवर्तनावर ही कडक नजर ठेवली जाणार आहे,त्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सकाळी-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी आरटीओचे दोन अधिकारी ही प्रत्यक्ष असतील.महत्त्वाचे म्हणजे, हे आरटीओचे अधिकारी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी चार तास असतील.

शिवाय नियम मोडणाऱ्या आणि प्रवाशांशी गैरवर्तन करत असलेल्या चालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करतील, त्यामुळे लवकरच स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच मदत होणार आहे.याशिवाय,ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वागळे इस्टेट, कोपरी आणि इंदिरानगर या सारख्या प्रमुख गर्दीच्या भागांमध्ये कायमस्वरुपी पोलीस तैनात करण्यात येतील, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *