Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!
गुन्हे ठाणे

Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Aug 15, 2026

ठाणे १५ : ठाण्यातील राबोडी भागातील माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या पतसंस्थेचे माजी शाखा व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजेंद्र गंगाराम दासगुडे यांच्यावर ठेवीदार आणि खातेदारांची सुमारे १ कोटी ८० हजार ८४४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट येथील रहिवासी असलेल्या एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून राबोडी पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली.दासगुडे यांनी २०१७ ते एप्रिल २०२६ या नऊ वर्षांच्या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करून हा गैरव्यवहार केला.

त्यांनी ठेवीदारांकडून रोख रक्कम स्वीकारून त्यांना बनावट मुदत ठेव (FD) प्रमाणपत्रे दिली, परंतु या रक्कमेची पतसंस्थेच्या अधिकृत खात्यांमध्ये कोणतीही नोंद केली नाही. याशिवाय, खातेदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांच्या बचत आणि ठेव खात्यांमधून अनधिकृतपणे रोख रक्कम काढून घेतली.तसेच, कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते रोखीने स्वीकारल्यानंतर त्यांची संगणक प्रणालीमध्ये नोंद न करता ती रक्कम स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ठेवून घेतली. अशा प्रकारे विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *