Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धाकानं लाल रंग झाला गायब’; मुंबईतल्या स्ट्रीट फूडमधली भेसळ संपतेय!
अन्न सुरक्षा आरोग्य ताज्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धाकानं लाल रंग झाला गायब’; मुंबईतल्या स्ट्रीट फूडमधली भेसळ संपतेय!

Aug 18, 2026

मुंबई : १८ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे नाव सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे. एफडीएचा कारभार स्वीकारल्यापासून त्यांनी भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे राज्यभरात अनधिकृत व भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच कारवाईचा थेट प्रभाव मुंबईतील स्ट्रीट फूडवर दिसून येत आहे. अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या रंगांच्या बेसुमार वापरावर आता लगाम लागला आहे. एका खव्व्याने सोशल मीडियावरून तुकाराम मुंढे यांचे आभार मानत शहरातील बदलत्या चित्रावर प्रकाश टाकला आहे. पूर्वी शोरमा किंवा इतर स्ट्रीट फूड खाल्यानंतर हातावर मेहंदीसारखा रंग चढायचा, परंतु एफडीएच्या धडक कारवाईनंतर आता पदार्थांमधील हानिकारक फूड कलर गायब झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘fitwithrohitttttt’ या पेजवर पोस्ट करण्यात आलेली ही माहिती सध्या तुफान लोकप्रिय ठरत आहे. ही बातमी आतापर्यंत तब्बल ८४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली असून ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कामगिरीचे नेटकरी उघडपणे कौतुक करत आहेत.गेल्या काही दिवसांत एफडीएने अनेक मोठ्या खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईचा धडा घेत आता गल्लीबोळांतील छोटे विक्रेतेसुद्धा अत्यंत सावध झाले आहेत. स्ट्रीट फूड विक्रेत्यांकडून आता स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जात असून भेसळ रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येणार नाही.

वर्तमानपत्रात अन्न देण्यावर पूर्ण बंदी घालून फक्त फूड-ग्रेड पॅकेजिंगचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, FoSTaC प्रशिक्षण, वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर कठोर निर्बंध आणि मेनू कार्डवर कॅलरी, ॲलर्जन्स व मांसाहारी माहिती देणे सक्तीचे केले आहे. अस्वच्छ आणि भेसळयुक्त अन्नामुळे विषबाधा होत असल्याने सुरक्षित अन्न हा प्रत्येकाचा अधिकार असून, मुंढे यांच्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *