UPI वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, व्यवहारावेळी आता पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही, NPCI चा नवा नियम!
माहिती

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, व्यवहारावेळी आता पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही, NPCI चा नवा नियम!

Jul 30, 2026

देशभरातील UPI वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला अधिक बळकटी देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर सर्व UPI ॲप्सवर व्यवहार करताना आता वापरकर्त्यांचा संपूर्ण मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणार नाहीNPCI ने ५ जून २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात UPI सेवा पुरवणाऱ्या सर्व बँका आणि पेमेंट ॲप्सना ग्राहकांची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार व्यवहारादरम्यान मोबाईल क्रमांक पूर्णपणे न दाखवता केवळ काही अंकच दिसतील.

यासोबतच, UPI आयडी, बँक खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती आणि वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती अनावश्यकपणे इतरांना दिसणार नाही याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. NPCI ने वापरकर्त्यांना मोबाईल क्रमांकावर आधारित UPI आयडीऐवजी वेगळी UPI आयडी तयार करून ती डिफॉल्ट म्हणून वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे. त्यामुळे व्यवहार करताना मोबाईल क्रमांक शेअर करण्याची गरज कमी होईल.

या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व UPI सेवा पुरवठादारांना ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर UPI ॲप्समध्ये हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील. या निर्णयामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित, गोपनीय आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल. तसेच मोबाईल नंबरचा गैरवापर, स्पॅम कॉल्स आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांवरही काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *