दिवा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनाविरोधात महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे ताज्या बातम्या न्यूज

दिवा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनाविरोधात महापालिकेची विशेष मोहिम!

Jul 31, 2026

ठाणे (31): ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत नळसंयोजनांविरोधात विशेष कारवाई मोहिम सुरू आहे. या मोहिमेत चार ठिकाणी एकूण आठ अनधिकृत नळसंयोजन खंडित करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पाईप व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान भोलेनाथ नगर येथील 660 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील 3 नळसंयोजने खंडित करण्यात आली. शिवली नगर नाला येथील 350 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील 2 नळ संयोजने, नागरा पेट्रोल पंप परिसरातील 150 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील 2 नळसंयोजने, तसेच शिळफाटा येथील हावरे प्रोजेक्ट समोरील 250 मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील 1 नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सिंक, एचडीपीई पाईप तसेच विविध आकारांचे पाईप आदी साहित्य जप्त करण्यात आले. या मोहिमेत एकूण 8 अनधिकृत नळसंयोजन खंडित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. महापालिकेने नागरिकांना अनधिकृत नळसंयोजन घेऊ नयेत, तसेच अधिकृत प्रक्रियेद्वारेच पाणी जोडणी घ्यावी, असे आवाहन केले असून, अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *