लालबागचा राजा’कडून ‘भुलेश्वरचा राजा’ला ₹२१लाखांची मदत…भाजपच्या ‘या’ मंत्र्याने स्वतःच्या खिशातून मृतांच्या कुटुंबांना दिले ₹१० लाख!
ताज्या बातम्या

लालबागचा राजा’कडून ‘भुलेश्वरचा राजा’ला ₹२१लाखांची मदत…भाजपच्या ‘या’ मंत्र्याने स्वतःच्या खिशातून मृतांच्या कुटुंबांना दिले ₹१० लाख!

Aug 25, 2026

‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाची मूर्ती मंडपाच्या दिशेने घेऊन जाताना कोसळली यामध्ये दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. शनिवारच्या या अपघातांनंतर आता या मंडळासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.’भुलेश्वरचा राजा’ मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोन गणेशभक्तांचा मुंबईत शनिवारी मृत्यू झाला आहे. या दुःखद प्रसंगी लालबागचा राजा मंडळ मदतीसाठी धावून आलं आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजाने मृतांच्या कुटुंबाला जितकी मदत केली आहे तितकीच मदत भाजपच्या एका मंत्र्याने आपल्या वैयक्तिक पातळीवर जाहीर करत मृतांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

लालबागचा राजाकडून २१ लाख रुपये

दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कोसळली. तर दोन जणांचा मृत्यू झाला. भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाने यावर्षी २७ फुटांची गणेशमूर्ती बनवली होती. गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक सुरू होती. त्याचवेळी ही मूर्ती वेल्डिंग तुटल्याने समोरच्या बाजूने झुकली आणि पडली. यात मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचा डोंगरच कोसळला. या वाईट प्रसंगी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ मदतीसाठी धावून आले असून मंडळाकडून भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा मंडळाकडून ११ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर गणेशमूर्ती कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत केली जाणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही मदत जाहीर केली आहे. एकूण २१ लाखांची मदत दिली जाणार आहे.

भाजपा नेत्याने जाहीर केली मदत

विशेष म्हणजे लालबागचा राजा मंडळाबरोबरच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीही ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना आणि जखमी झालेल्यांना व्यक्तिगत आर्थिक मदत जाहीर केली आहे. आशिष शेलार यांच्याकडून मृतांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आशिष शेलार यांनी या दुर्घटनेसंदर्भात बोलताना, “ही दुर्दैवी घटना आहे. यात आमचे दोन गणेशसेवक आपल्यातून निघून गेले. त्यांना मी आदरांजली देतो. जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत. त्यांच्या परिवारांना मी भेटलो. पोलिसांशी मी बोललो आहे. या मागच कारण काय आणि घटना कशी घडली याची चौकशी पोलीस करत आहेत,” असं सांगितलं.

आपण उत्साहात सण साजरा करतो पण ही घटना दुख देणारी आहे. सरकारकडून काही मदत केली जाईल ते आम्ही बघू. महापालिका, पोलीस, अन्य व्यवस्था याचा दोष कोणाचा? दुर्घटनेमागचं कारण हा चौकशीचा मुद्दा आहे. काल मी आयुक्तांशी बोललो. आज सकाळीदेखील बोललो. पाटा खालच्या व्हिलच्या दणक्याची चिंता केली पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे कि सूचनांचं पालन केलं गेलं पाहिजे. आगमनाच्या अगोदर रस्त्यांवर तातडीने काम केलं पाहिजे. गणेशभक्त सगळे शोक करत आहेत. आज मी गणेश मूर्तीच्या उंचीवर भाष्य करणार नाही. सगळ्यांसोबत चर्चा करून आम्ही या बाबत भाष्य करू,” असंही शेलार यांनी स्पष्ट केलं!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *