Thane १८ :मालमत्ता करवाढीवरून ठाण्यात भाजप आक्रमक…२८ नगरसेवकांचा विरोध.. निवासी मालमत्तांवर १२ टक्के, वाणिज्य मालमत्तांवर २० टक्के वाढीला विरोध; आधी थकबाकी वसुली करा, भाजपची मागणी!
ठाणे १९ : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीवरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शविला असून, ही करवाढ सामान्य ठाणेकरांवर आर्थिक बोजा टाकणारी असल्याचा आरोप भाजपने केला
Buldhana १८ : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय; प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून स्मारकाच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार!
मुंबई, दि.१८: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला आहे. या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाचा कामाला तत्काळ गती देता येणे शक्य होणार आहे. सिंदखेडराजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी
Prakash Abitkar : सर्पदंश‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित…सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध!
मुंबई,दि.१८ : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची
Thane: नितीन उड्डाणंपुलाचं “नाना शंकर शेट” नामकरणाचा ठराव महासभेत मंजूर!
ठाणे, दि. १८ – भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार,थोर समाजसुधारक आणि ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नाना शंकरशेट यांचे नाव ठाण्याच्या महामार्गावरील नितीन उड्डाणपुलाला देण्याचा ठराव काल झालेल्या महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेने नानांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करून त्यांच्या स्मृती
दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती..मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तीव्र चिंता; “न्यायासाठीचा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहणार!
ठाणे १८ : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला असून, त्याची जन्मठेपेची शिक्षा अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गंभीर दखल घेत तीव्र चिंता आणि
Thane: एसआरएच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांचे निर्देश…विविध विभागांच्या कामकाजाचा व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा!
ठाणे १८: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी आज आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणातील सुरू असलेल्या, पूर्ण झालेल्या, प्रलंबित असलेल्या तसेच प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेऊन सर्व प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित
Thane: ठामपा प्रशासन आणि सत्ताधारी दात कोरून पोट भरण्याचे उद्योग करताहेत. करवाढी विरोधात राष्ट्रवादी (श.प.) आक्रमक ठाणेकरांच्या खिशावरील दरोडा सहन करणार नाही – मनोज प्रधान!
ठाणे १८ – ठाणे महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (शिंदे) यांनी आपला वचननामा जाहीर केला होता. या जाहिरनाम्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटल, तसेच कासारवडवली खाडी किनारी 50 एकर क्षेत्रात आयफेल टॉवरच्या धर्तीवर 260 मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, अद्ययावत आरोग्य सुविधा यासह
Thane: बदलत्या ठाण्याचा विकास छायाचित्रातून मांडावा … उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील पत्रकार भवन प्रश्न मार्गी लावणार जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन!
ठाणे १८ : छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय.. ठाण्याचा होत असलेला विकास
ठाणे १८ -दोषसिद्धी-पत्नीला पेटवले…घरगुती वादातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या ठाण्यातील व्यक्तीला जन्मठेप!
ठाणे, १८ ऑगस्ट – मे २०१५ मध्ये झालेल्या एका किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिची हत्या केल्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने मंगळवारी एका ३८ वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्यायाधीशांनी आरोपीला १,००० रुपयांचा दंडही ठोठावला.सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धाकानं लाल रंग झाला गायब’; मुंबईतल्या स्ट्रीट फूडमधली भेसळ संपतेय!
मुंबई : १८ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे नाव सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे. एफडीएचा कारभार स्वीकारल्यापासून त्यांनी भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे राज्यभरात अनधिकृत व भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण
