Bjp – Mahayuti : दहीहंडी पथकांसाठी मोठा दिलासा! राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना मिळणार मोफत विमा संरक्षण; भाजप – महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई ०८ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी भाजप – महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडी फोडताना किंवा मानवी मनोरे रचताना दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास, गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत दहीहंडीदरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांची आर्थिक मदत संबंधित गोविंदाला किंवा त्याच्या कुटुंबाला दिली जाणार आहे. मानवी मनोऱ्यांची ही वैभवशाली परंपरा जपताना गोविंदांच्या उत्साहाला सुरक्षेचे कवच देणारा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यभरातील सर्व गोविंदा पथकांमध्ये आणि आयोजकांमध्ये अत्यंत आनंदाचे तसेच समाधानाचे वातावरण पसरले आहे!
