Chatrpati Sambhaji nager: खवड्या डोंगर प्रकरण: कौटुंबिक वादातून तीन जणांचा मृत्यू? आईच्या व्हिडिओने उघड केला नवा ट्विस्ट!
ताज्या बातम्या

Chatrpati Sambhaji nager: खवड्या डोंगर प्रकरण: कौटुंबिक वादातून तीन जणांचा मृत्यू? आईच्या व्हिडिओने उघड केला नवा ट्विस्ट!

Aug 23, 2026

छत्रपती संभाजी नगर २३ : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनेनंतर प्रकरणात कौटुंबिक वादाचा नवा पैलू समोर आला असून संगीता चांदगुडे यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे मोठी खळबळ माजली आहे.सुरवातीला या वादामागे आयफोन खरेदी किंवा त्याच्या ईएमआयचा मुद्दा असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, डीसीपी नवले यांनी प्राथमिक तपासात आयफोन आणि मृत्यूंमध्ये कोणताही थेट संबंध किंवा पुरावा आढळला नसल्याचे स्पष्ट करत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.

संगीता चांदगुडे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये त्यांनी पती मुरलीधर यांच्यासोबतच्या कौटुंबिक तणावाबद्दल आणि घरांमधील परिस्थितीबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.संगीता यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला होता आणि त्यानंतर घरांमधील मतभेद अधिक तीव्र झाले. काही नातेवाईकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी या व्हिडिओंमध्ये केला आहे.

या सोशल मीडिया व्हिडिओमधील आरोप आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय, हे पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे. संगीता यांनी उल्लेख केलेली ‘तिसरी व्यक्ती’ कोण आहे, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असली तरी या आरोपांना अधिकृत निष्कर्ष मानू नये. पोलिस तपासातूनच खरे सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *