Thane – ठाणे-गणपतीपुळे आणि दादर-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा;आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा!
ठाणे ताज्या बातम्या

Thane – ठाणे-गणपतीपुळे आणि दादर-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा;आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा!

Aug 23, 2026

ठाणे २३ : ठाणे-गणपतीपुळे एसटी ठराविक मार्गाने सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा १४ गावांना होणार आहे. तर दादर सावंतवाडी रेल्वेबाबत देखील आवश्यक थांब्यांसाठी दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

ठाणे-गणपतीपुळे एसटी गणेशोत्सव काळात ठराविक मार्गाने नेल्यास १४ गावांना त्याचा फायदा होईल अशी विनंती कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आमदार केळकर यांच्याकडे केली होती. याबाबत श्री. केळकर यांनी विभाग नियंत्रकांना पत्र देऊन पाठपुरावा केला होता. त्यांनतर आठवड्याभरात ही बससेवा सुरू करण्यात आली. ही बस ठराविक मार्गाने जात असल्याने सुमारे गावांतील ग्रामस्थांना त्याचा लाभ होत आहे. प्रवाशांची संख्या पुरेशी राहिली तर ही सेवा केवळ गणेशोत्सव काळातच नाही तर वर्षभर सुरू ठेवण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांनी सांगितल्याचे श्री.केळकर म्हणाले.

दादर-सावंतवाडी ही कोकण रेल्वे मोठ्या स्थानकांमध्ये थांबते. मात्र खेडनंतर किंवा या स्थानकाच्या आसपास थांबा नसल्याने ग्रामस्थ आणि ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची ससेहोलपट होत असते. ही रेल्वे सापे, वीर आदी छोट्या स्थानकांमध्ये थांबल्यास तेथील हजारो ग्रामस्थ आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत श्री. केळकर यांनी पाठपुरावा सुरू केला असून दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *