Kalwa: धावत्या मुंबई लोकलच्या दरवाजातून निसटून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
ताज्या बातम्या वाहतूक

Kalwa: धावत्या मुंबई लोकलच्या दरवाजातून निसटून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Aug 10, 2026

कळवा १० : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर कळवा स्थानकादरम्यान धावत्या ट्रेनमधून खाली पडून १७ वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहम्मद फाजील शफीक अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून तो भिवंडीतील बाला कंपाऊंड परिसरातील रहिवासी होता. फाजील आपल्या मित्रांसोबत मुंबईत फिरण्यासाठी भिवंडीहून कल्याणला आला होता आणि तेथून लोकलने प्रवास करत होता.

प्रवासादरम्यान तो लोकलच्या दरवाज्यात उभा असताना अचानक त्याचा हात निसटला आणि तोल जाऊन तो खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबातील मोठा मुलगा असलेल्या फाजीलच्या या अचानक जाण्याने त्याच्या आई-वडील आणि लहान भावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *