Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!
राजकारण

Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!

Aug 5, 2026

पालघर ०५: पालघर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या गोंधळात सुनील राऊत यांना गंभीर दुखापत झाली.घटनेनंतर सुनील राऊत यांनी मनसेचे जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे.

दुसरीकडे, या हाणामारीत तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण झाल्याने पालघरमधील मनसेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुनील राऊत यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे. पक्षाच्या कार्यालयातच झालेल्या या घटनेमुळे मनसेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *