SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
ताज्या बातम्या न्यूज

SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!

Aug 6, 2026

​मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

​ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी मोबाईलमध्ये भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकृत ECINet अ‍ॅप डाऊनलोड करावे. अ‍ॅपमधील ‘Search Your Name in Last SIR’ या पर्यायावर जाऊन आपले राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडावा. तेथे २००२ च्या SIR यादीत स्वतःचे किंवा आई-वडील, आजी-आजोबांचे नाव शोधून त्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा.

​त्यानंतर ‘Voter Registration Forms’ मध्ये जाऊन ‘Special Intensive Revision – Fill Enumeration Form Online’ हा पर्याय निवडावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल नंबर किंवा OTP च्या साहाय्याने नोंदणी करावी, तर आधीपासून खाते असल्यास थेट लॉगिन करावे. फॉर्म भरताना ‘महाराष्ट्र’ राज्य निवडून आपला EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकावा. माहिती तपासल्यानंतर योग्य पर्याय निवडावा जसे की २००२ च्या SIR यादीत स्वतःचे नाव असल्यास पहिला पर्याय, नातेवाईकांचे नाव असल्यास दुसरा, सध्याच्या मतदार यादीतील घरातील सदस्याचे नाव असल्यास तिसरा आणि इतर सर्व प्रकरणांसाठी चौथा पर्याय निवडावा.

​यापुढील टप्प्यात वैयक्तिक माहिती, नातेवाईकांची माहिती, जन्मतारीख आणि इतर आवश्यक तपशील भरून नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. सर्व भरलेली माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घोषणापत्र (Declaration) स्वीकारावे आणि आधार OTP च्या मदतीने e-Sign प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सबमिट झाल्यावर मिळणारा Reference ID भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सुरक्षित सेव्ह करून ठेवावा.

​जर फॉर्म भरताना नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत असेल, मोबाईल क्रमांक लिंक नसेल किंवा OTP मिळण्यात काही अडचण येत असेल, तर वेळ न घालवता थेट आपल्या BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *