Ganpati agman sohla: परळ-चिंचपोकळी भागात मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद: दगडफेकीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात!
मुंबई २७ : मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्याच्या प्रकारानंतर परिसरात तणाव वाढला, तसंच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सध्या परिसरात शांतता असून सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवरून अफवा पसरण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अपुष्ट किंवा संशयास्पद माहितीवर विश्वास न ठेवण्याचे व अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. शांतता व संयम बाळगण्याचे आवाहन करत पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत!
