Thane – कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा;  कंत्राटदारांच्या आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून – मनोज प्रधान
ठाणे ताज्या बातम्या

Thane – कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा; कंत्राटदारांच्या आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून – मनोज प्रधान

Aug 26, 2026

ठाणे २६ : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनीही आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून ,”ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याने संबधितांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्या आणि काम घ्यावी अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्रालदार महासंघाने आवाहन केले आहे.

नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू तसेच कंत्राटदार महासंघ च्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले.

तर, या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. या पत्रात, प्रलंबित बिलांमुळे कर्जबाजारी झालेल्या आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे, असा आमचा आरोप आहे.जे कुणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्येवर गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *