Thane : ठाणे महानगरपालिका कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद!
ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजयजी केळकर साहेब यांनी दिनांक १०/०८/२०२६ रोजी प्रशासनासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.सदर बैठकीमध्ये कर्मचारी व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील एकूण दहा विषयांपैकी तीन महत्त्वाचे विषय प्रशासनाने तत्काळ मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून, त्यासंदर्भात परिपत्रके निर्गमित करण्यात आली आहेत.
तातडीने कार्यवाही करण्यात आलेले प्रमुख विषय :
१. १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना :महानगरपालिका कर्मचारी व संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करून त्याचा आर्थिक लाभ तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
२. लिपिकांना पदोन्नती :महानगरपालिकेतील पात्र लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देऊन तात्काळ नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना :डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांपैकी वरील तीन महत्त्वाचे विषय तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आमदार संजयजी केळकर साहेब तसेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे कामगारांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.सदर बैठकीमध्ये एकूण दहा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती.
त्यापैकी तीन विषयांवर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू करून त्यासंदर्भात परिपत्रके निर्गमित केली आहेत. उर्वरित प्रलंबित विषयांच्या निराकरणासाठी आमदार संजयजी केळकर साहेब स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहेत.
बैठकीस उपस्थित मान्यवर :.सदर बैठकीस नगरसेवक, पदाधिकारी तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी श्री. विकास पाटील, सौ. उषाताई वाघ, श्री. सुरेश कांबळे, श्री. विशाल वाघ, श्री. रविंद्र रेड्डी, श्री. राजाभाऊ सोनगडा, श्री. दयाशंकर यादव, श्री. दत्ता घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे कामगार वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे!
