Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!

Aug 20, 2026

ठाणे २० : ठाणे शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात गुरुवारी सकाळपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे.कारवाईचे मुख्य कारण आणि पार्श्वभूमी:अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्यामुळे प्रवाशांसोबत वाद होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावर तोडगा म्हणून परिवहन मंत्र्यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’ अंतर्गत चालकांना दैनंदिन संवादासाठी आवश्यक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

ही मुदत संपल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.कशी चालली आहे तपासणी?गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून ठाणे स्टेशन, माजिवडा, वागळे इस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात चार विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. RTO अधिकारी रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्याशी मराठीत संवाद साधत आहेत. ज्यांना मराठी बोलता येते, त्यांना तपासणीनंतर सोडले जात आहे.मराठी न आल्यास काय होणार?ज्या रिक्षाचालकांना मराठीत संवाद साधता येत नाही, त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटीसद्वारे त्यांना १ महिन्याची मुदत मराठी शिकण्यासाठी दिली जात आहे.महिन्याभरांनंतर या चालकांची पुन्हा मराठी संवादाची क्षमता तपासली जाईल. त्यानंतरही मराठी बोलता न आल्यास, संबंधित रिक्षाचालकाचा बॅच निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *