पुण्यात FDA चा मोठा धडाका, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हॉटेल्स, बेकऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
अन्न सुरक्षा पुणे

पुण्यात FDA चा मोठा धडाका, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हॉटेल्स, बेकऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

Jul 30, 2026

पुणे दि ३०: अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. ‘सेफ फूड, सेफ ईट, सेफ महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे, सांगली आणि कोल्हापूर भागातील तब्बल २१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या या आक्रमक भूमिकेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

तपासणीत भीषण अस्वच्छता उघड

​अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार एफडीएच्या पथकाने विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून पाहणी केली. या तपासणी दरम्यान अनेक आस्थापनांमध्ये भीषण अस्वच्छता, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि परवान्यातील अटी-शर्ती धाब्यावर बसवल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या आस्थापनांवर कोणत्याही प्रकारची शिथिलता न दाखवता तात्काळ परवाने निलंबनाचा बडगा उभारण्यात आला.

कारवाई झालेली प्रमुख ठिकाणे:

  • पुणे व परिसर: न्यु सम्राट हॉटेल, हॉटेल केसर (लोणावळा), इंटिग्रेटेड फूड सर्व्हिसेस (बालेवाडी), क्रिमलाईट कन्फेक्शनर्स (लोहगाव व विमाननगर), हॉटेल ताजमहाल (प्रभात रोड), संस्कृती फुड्स (कोरडेवाडी, जुन्नर), स्वीकार्स ई एन्ड टी प्रा. लि. (मिलिंद रोड), मे. माधव डेअरी (मंगळवार पेठ), मदिना फॅमिली रेस्टॉरंट (भवानी पेठ), शिव डेअरी व इंडियन बेकरी.
  • सांगली परिसर: हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट (शिरढोण), मे. मेरी कॉर्नर रेस्टॉरंट (ईश्वरपूर), हॉटेल १२२० (कवठे महांकाळ).
  • कोल्हापूर परिसर: श्रीकृष्ण बेकरी (शिरोली), आयेशा बेकरी (इचलकरंजी), बंगलोर अय्यंगार बेकरी (कराड), डायमंड बेकरी (विक्रम नगर), केदारलिंग बेकरी (रंकाळा).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *