ठाणे: टाटा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ८० वर्षीय मातोश्रींचा इमारतीवरून पडून दुर्दैवी अंत!
ठाणे

ठाणे: टाटा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ८० वर्षीय मातोश्रींचा इमारतीवरून पडून दुर्दैवी अंत!

Aug 6, 2026

ठाणे ०५: ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील ‘सवाना’ या उच्चभ्रू बहुमजली इमारतीत एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. टाटा समूहातील वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत शेट्टी यांच्या ८० वर्षीय मातोश्री कुमुदा शेट्टी यांचा इमारतीवरून खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदा शेट्टी या सवाना इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून खाली पडल्या. प्रचंड उंचावरून खाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी इमारतीवरून खाली उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले की हा केवळ एक अपघात होता, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नसून पोलिसांनी याबाबत अजून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वर्तक नगर पोलिसांकडून प्रशांत शेट्टी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच घटनेचे सत्य शोधण्यासाठी इमारतीमधील सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *