मुंबई-कोकण प्रवाशांसाठी खुशखबर.. CSMT-सावंतवाडी रोड दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेसला मंजुरी!
वाहतूक

मुंबई-कोकण प्रवाशांसाठी खुशखबर.. CSMT-सावंतवाडी रोड दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेसला मंजुरी!

Aug 2, 2026

Kokan railway : कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या रेल्वे सेवेमुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.नवीन वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक १५०८७ मुंबईहून सावंतवाडी रोडकडे, तर गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोडहून मुंबईकडे दररोज धावणार आहे.

ही एक्सप्रेस दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.या रेल्वे सेवेचा सर्वाधिक लाभ शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई-कोकण दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही हा प्रवास अधिक सोयीचा ठरणार आहे.भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *