Auto Drivers strike : मराठी भाषेच्या सक्तीविरोधात मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा ३ दिवसांचा संप; दंडाच्या कारवाईमुळे परप्रांतीय चालक आक्रमक!
मुंबई २४ : राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली असून, या निर्णयाविरोधात मुंबईतील परप्रांतीयांसह काही रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेत तीन दिवसांचा संप पुकारला आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी पसून त्यांनी कांदिवली लिंक रोडवर रस्ता अडवून निदर्शने केली.
आंदोलक चालकांच्या मते, ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनेक ज्येष्ठ चालकांचे औपचारिक शिक्षण अत्यंत कमी किंवा अजिबात झालेले नाही, त्यामुळे अचानक भाषेची अट पूर्ण करणे त्यांच्यासाठी कठीण जात आहे. अनेक चालक थोडेफार मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत असतानाही, त्यांना पुरेसा वेळ न देता थेट १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या नियम आणि कारवाईमुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने, योग्य न्याय मिळेपर्यंत तीन दिवसांचा संप मागे घेणार नसल्याचा पवित्रा चालकांनी घेतला आहे, ज्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे!
