Thane: ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दौलत विठ्ठल चव्हाण यांची निवड!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दौलत विठ्ठल चव्हाण यांची निवड!

Aug 27, 2026

ठाणे २७ : ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघ हा महाराष्ट्र राज्य शिक्षणव्रती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाशी संलग्न करण्यात आल्यानंतर संघटनेच्या नियम व अधिकारानुसार कार्यकारिणीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत.संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाच्या कार्यकारिणीत आवश्यक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार श्री. दौलत विठ्ठल चव्हाण यांची ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.श्री. दौलत विठ्ठल चव्हाण हे ठाणे ग्रामीण तसेच ठाणे शहर या दोन्ही भागांमध्ये समन्वय साधणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.

गेल्या २० वर्षांपासून ते क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, कार्याचा व्यापक आवाका आणि विविध घटकांशी असलेला समन्वय यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका संघटित व्यासपीठावर आणणे, त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक व संघटनात्मक भूमिका बजावणे, या व्यापक उद्देशाने त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.कार्यकारिणीतील इतर पदांमध्येही आवश्यक बदल व खांदेपालट करण्यात येणार असून, त्याबाबतची अधिकृत माहिती स्वतंत्रपणे लवकरच कळविण्यात येईल!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *