Kharghar: खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प!
नवी मुंबई २६ : नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.शॉर्टसर्किटनंतर वायरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून लोकल सेवा थांबवली.
अचानक लोकल सेवा बंद झाल्याने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ठाणे आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शॉर्टसर्किट झालेल्या ओव्हरहेड वायरची पाहणी करून सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत!
