Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!
गुन्हे

Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!

Aug 5, 2026

नवीन पनवेल ०५ : पनवेल येथील वाल्मिक नगर परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी २४ वर्षीय सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी वाल्मिक नगर परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने हातवारे करून तिला जवळील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात बोलावले. तिथे नेल्यानंतर त्याने शौचालयाचा दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, संशय आल्याने परिसरातील काही नागरिकांनी शौचालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्यांनी मुलीची सुटका करत आरोपीला बाहेर काढले. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला मारहाण केली आणि त्यानंतर पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *