Thane: संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६; जल्लोषासाठी गोविंदा पथके सज्ज…आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन; हास्य जत्रा फेम कलाकारांचीही उपस्थिती!
ठाणे : महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय दहीहंडी उत्सवाला आधुनिकतेची जोड देत संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजक आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवासाठी विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचे थरारक सादरीकरण करण्यात येणार आहे.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गोविंदांचा उत्साह यामुळे उत्सवस्थळी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.यंदाच्या उत्सवासाठी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिक आणि गोविंदा पथके सहभागी होणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा तसेच महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.दरम्यान, या दहीहंडी उत्सवाला मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचीही उपस्थिती लाभली.
‘हास्य जत्रा’ फेम अमीर हडकर, अभिनेता दिगंबर नाईक, दीपक वेतकर आणि राजू फाटक यांची उपस्थिती उत्सवाचे आकर्षण ठरली.परंपरा, एकता आणि उत्साहाचा संगम असलेल्या या दहीहंडी उत्सवाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक भव्य आणि अविस्मरणीय करण्याचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे!
