Thane – फायनान्स कंपनीच्या घोटाळा प्रकरणात कारवाईची दिशा ठरली..जनसेवकाचा जनसंवादमध्ये तपास अधिकाऱ्यांची उपास्थिती!
ठाणे ताज्या बातम्या

Thane – फायनान्स कंपनीच्या घोटाळा प्रकरणात कारवाईची दिशा ठरली..जनसेवकाचा जनसंवादमध्ये तपास अधिकाऱ्यांची उपास्थिती!

Aug 23, 2026

ठाणे २३ : ठाण्यासह अनेक शहरांत २०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी एका फायनान्स कंपनीने फसवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी यांनी चर्चा घडवून आणली. या प्रकरणात अंदाजे २०० कोटींची फसवणूक झाली असून कंपनीच्या इतर संचालकांना ताब्यात घेण्यात आले असले तरी मुख्य सूत्रधार सचिन राणे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तसेच या प्रकरणात कंपनीची किती मालमत्ता जप्त करण्यात आली , गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, सुत्रधाराला कधी अटक करणार यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कारवाईची दिशा ठरवण्यात आली असून याबाबत गृह सचिवांकडे देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी माध्यमांना दिली.रखडलेल्या एसआरए आणि पुनर्विकास प्रकल्पातील पीडित रहिवाशांचे प्रतिनिधी देखील कार्यक्रमात उपास्थित होते. शेलार पाडा येथील एसआरए प्रकल्पात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विकासक काम करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या प्रकल्पासह तीन ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते. या प्रकरणांत वेळ पडली तर विकासकांना बदलण्यास भाग पाडू अशी भूमिका श्री. केळकर यांनी घेतली. चरई भागातील गंगाधर सोसायटीचा पुनर्विकास गेली सहा वर्षे रखडला असून संबंधित विकासकाशी संपर्क साधून चर्चा केली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा आणि समन्वयातून प्रयत्न करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. कार्यक्रमात सायबर फसवणूक, जातीचे दाखले आदी बाबतची निवेदने देखील प्राप्त झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही प्रकरणे देखील मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कैलास म्हात्रे, निलेश पाटील, सुरज दळवी, अल्केश कदम, मंजुळा मळेकर आदी उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *