Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!

Sep 6, 2026

ठाणे : ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मानवी मनोरे रचताना तब्बल ५६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये १४ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. जखमी गोविंदांमध्ये ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरातील गोविंदांची संख्या अधिक आहे. काही गोविंदांना किरकोळ दुखापत झाली असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. काहींच्या पायाला अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला असून, अनेकांच्या पाठीला, खांद्याला, गुडघ्याला, मानेला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे.ठाणे शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते.

यंदाही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात तब्बल २५४ दहीहंडींचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ठाणे शहरासह विविध भागांतील गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी ठाण्यात दाखल झाली होती. दिवसभर विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा रंगल्या होत्या. मात्र, मानवी मनोरे रचताना अनेक गोविंदा जखमी झाले.जखमींमध्ये १४ वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. काही मुलांच्या हाताला, पायाला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर फ्रॅक्चर किंवा इतर दुखापत झालेल्या गोविंदांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींच्या यादीमध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील गोविंदांचा समावेश आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *