Thane News: मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल!
Varsha marathon: ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत ३० हजार स्पर्धकांची नोंदणी झाल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. तसेच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याची मोहीमही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनही मैदानात उतरल्याचे चित्र आहे.ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन आणि सर्व संबंधित विभाग सज्ज झाले आहेत.
विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. पावसाळी वातावरण, रस्त्यांची परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.यंदा तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागीपार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, बॅरिकेडिंग, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोबाइल टॉयलेट्स आणि स्वयंसेवकांची नियुक्ती आदी तयारीचा आढावा आयुक्तांनी सर्व विभागांकडून घेतला. यंदा तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने प्रत्येक सहभागी सुरक्षितपणे स्पर्धेत सहभागी होऊन सुखरूप घरी परत जाईल, यावर प्रशासनाचा भर असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजनविशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, शाळा, शिक्षक, बसचालक आणि स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात आला आहे.पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यतामॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. या बदलांमुळे ठाणे शहरातील पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे. शनिवार, २९ ऑगस्ट रात्री ८ ते रविवार, ३० ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.अल्मेडा सिग्नल येथे प्रवेशबंदीनितीन कंपनी येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नितीन कंपनी येथे प्रवेशबंदी असेल.
येथील वाहने तीन हात नाका, हरिनिवासमार्गे वळविण्यात येतील. अल्मेडा सिग्नल येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अल्मेडा सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने वंदना एसटी आगार, खोपटमार्गे वळविण्यात येतील. ज्ञानेश्वरनगर, आंबेवाडी आणि कामगारनगर नाका येथून यशोधननगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कामगारनगर नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने इंदिरानगर नाका येथून वळविण्यात येतील.आज मार्गाची पाहणीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमण हटवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच शनिवार, २९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत!
