Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!
ठळक बातम्या वाहतूक

Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!

Aug 24, 2026

पालघर २४ : पालघर जिल्ह्यातील केळवा येथे १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी (CA Land) उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीतील अटींच्या पूर्ततेसाठी ही जमीन वापरली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महत्त्वाकांक्षी विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *