Thane: ठाण्यात ७० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यात ७० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली!

Aug 23, 2026

ठाणे २३ : ठाण्यातील नौपाडा येथील हरिनिवास चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ असलेली ‘निकम हाऊस’ ही ७० वर्षे जुनी एकमजली इमारत महापालिकेने आधीच धोकादायक घोषित केली होती. ही इमारत रिकामी करून तिच्या संरचनात्मक दुरुस्तीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते.आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या अत्यंत धोकादायक बनलेल्या इमारतीच्या सज्जाचा काही भाग अचानक खाली कोसळला.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने इमारतीत वास्तव्यास असलेल्या निकम कुटुंबियांना तत्काळ बाहेर पडून तिथे न राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतीवर पुढील आवश्यक कारवाई केली जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *