Tukaram Mundhe: उत्सावांवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण अन्नातील भेसळ खपवून घेणार नाही: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण!
ताज्या बातम्या

Tukaram Mundhe: उत्सावांवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण अन्नातील भेसळ खपवून घेणार नाही: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण!

Sep 7, 2026

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नवीन निर्देश जारी केले आहेत. अन्न भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये सणांच्या काळात भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, या आदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला जात असल्याने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या आदेशाचा नेमका अर्थ काय आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, एफडीए प्रशासन सण-उत्सवांवर कोणतेही निर्बंध घालत नसून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुरवले जाणारे अन्न सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करत आहे. अन्न व्यवसायासाठी नोंदणी आणि परवान्याशी संबंधित कायदेशीर चौकट २०११ पासूनच अस्तित्वात आहे. या नव्या आदेशामुळे कोणताही नवीन कायदा किंवा उत्सवांसाठी अतिरिक्त कायदेशीर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा एफडीएचा कोणताही उद्देश नसून, नागरिकांना मिळणारे अन्न सुरक्षित आणि भेसळमुक्त असावे, एवढाच यामागील हेतू आहे.

अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी एफडीए प्रशासनाने वर्षभरासाठी ‘फेस्टिव्हल एनफोर्समेंट कॅलेंडर’ तयार केले आहे. याअंतर्गत सण, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात अन्नपदार्थांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. एफडीएच्या या मोहिमेत मुख्यत्वे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मांस, फळे, सुका मेवा, उपवासाचे पदार्थ आणि बेकरी उत्पादने अशा खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष दिले जाईल. या तपासणीदरम्यान कोणत्याही पदार्थात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर कडक कारवाई केली जाईल, असा सडेतोड इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *