महापालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियंमाचे मंडळांनी पालन करुन सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा- महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे २१ : सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी ठाणे महापालिका, पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व दहीहंडी व सार्वजिनिक गणेशमंडळाने करावे
Thane: वाहतूक नियमभंगावर आता नागरिकांचा ‘वॉच’…. व्हॉट्सॲपवर करा तक्रार, पोलिसांकडून थेट कारवाई; ठाणे शहर वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम!
ठाणे २१ : ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी आता ठाणे वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाची कास धरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार असून, तक्रारीसोबत पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तत्काळ पडताळणी करून
Thane: नवीन ठाणे रेल्वे स्थानक: बांदल चाळीतील ५० कुटुंबांचे आधी पुनर्वसन, मगच कारवाई!
ठाणे २१ : ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी नवीन ठाणे रेल्वे स्थान उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या मार्गात गेल्या ६० वर्षांपासून असलेल्या बांदल चाळीतील ५० कुटुंबांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वे प्रशासनाकडून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्याने नागरिक हवालदिल
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026…ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करावे!
ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत महापालिका शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करण्याचे आवाहन उपायुक्त मीनल पालांडे यांनी आज
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त(१)पदी मनीष जोशी यांची नियुक्ती!
ठाणे २० : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदावर उपायुक्त मनीष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. त्यानुसार मनीष जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदाचा पदभार स्वीकारला. महापौर
Thane: ठाण्यात २ वर्षांच्या बालकाला दिला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस; प्रकृती बिघडल्याने पालकांची FDA व पोलिसांत तक्रार!
ठाणे २०: ठाण्यातील ढोकाळी परिसरात एका दोन वर्षांच्या बालकाला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचे वडील सिद्धांत बोचरे हे आपल्या दोन वर्षांच्या बालकाला घेऊन ढोकाळी येथील रवींद्र पान शॉपमध्ये गेले होते. मुलाला ज्यूस प्यायचा असल्याने त्यांनी तेथून ट्रॉपिकाना ज्यूस
Thane: रेल्वेलगतच्या बांदल चाळीचे आधी पुनर्वसन, नंतर निष्कासन..आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी!
ठाणे २० : नियोजित नवीन रेल्वे स्थानक उभारणीत बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.मीना यांनी मान्य केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.ठाणे रेल्वे स्थानकालगत
Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!
ठाणे २० : ठाणे शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात गुरुवारी सकाळपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे.कारवाईचे मुख्य कारण आणि पार्श्वभूमी:अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना
Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!
ठाणे, दि. १९ : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे,” असे प्रतिपादन
Thane – राष्ट्रवादी – अजित पवार गटाला खिंडार ; कल्याण एपीएमसीच्या माजी अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश!
ठाणे १९ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले आहे. कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
